चवाट गल्ली गणेश मंडळाची नूतन कार्यकारिणी जाहिर

चवाट गल्ली गणेश मंडळाची नूतन कार्यकारिणी जाहिर

बेळगाव :

बेळगाव चवाट गल्ली परिसरातील बेळगावाचा राजा गणपती म्हणून ज्याची ख्याती सीमाभागात प्रसिद्ध आहे अशा श्री गणेशोत्सव क्रांतिसिंह मंडळाची 2023 कार्यकारिणी नुकतीच जाहिर झाली

चवाट गल्ली बेळगाव येथील सार्वजनिक गणेशोत्सव क्रांतिसिंह मंडळाची बैठक शनिवारी रात्री 8 वाजता चवाट गल्ली येथील मारुती मंगल कार्यालयात संपन्न झाली. गल्लीतील सरपंच प्रतापराव मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली.

बैठकीच्या प्रारंभी बेंगलोर येथे कर्नाटक राज्य स्कूल ऑलंम्पिक संघटना आयोजित कर्नाटक राज्यस्तरीय स्कूल ऑलंम्पिक स्पर्धेत चवाट गल्लीतील सर्वेश राजेश नाईक व सोहम सचिन नाईक गोल्ड रौप्य पदक पटकाविले. व किसन राणोजी रेडेकर यांची बेळगाव तालुका सोसायटीत संचालकपदी निवड झाली यांचा अभिनंदन व सत्कार करण्यात आला. यानंतर गल्लीतील दिवंगत व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करून कार्यकारिणीची निवड करण्यात आली.

मंडळाच्या अध्यक्षपदी श्रीनाथ पवार, कार्याध्यक्ष सुनील जाधव स्वागताध्यक्ष उत्तम नाकाडी लक्ष्मण किल्लेकर, तर उपाध्यक्षपदी जोतिबा रामचंद्र पवार, प्रशांत (निशा) हणमंत कुडे, उमेश सुनील मोहिते,यांची निवड करण्यात आली. अन्य कार्यकारिणी पुढीलप्रमाणे:

सरचिटणीस आनंद आपटेकर, चिटणीस विशाल धनाजी गुंडकल सत्यम जोतिबा नाईक, खजिनदार सौरभ रमेश बामणे, उपखजिनदार निलेश परशराम गुंडकल, प्रभाकर बाळकृष्ण डकल पूजप्रमुख जोतिबा किल्लेकर, कार्यवाह निखिल विजय पाटील,वृषभ सुनील मोहिते, संघटक सुधीर धामणेकर, प्रसिद्धी प्रमुख महिंद्र पवार आकाश प्रभाकर कुकडोळकर मार्गदर्शक अनंत बामणे, विनायक पवार, विश्वनाथ मुचंडी,

हिशोब तपासणी जोतिबा धामणेकर, विवेक मोहिते, रोहन जाधव, पवन किल्लेकर, जोतिबा नाईक, संदीप कामुले, अनंत हांगीरगेकर, प्रियेश गौडडकर, यांच्या समावेश आहे.

पंच प्रताप मोहिते यांच्या नेतृत्वात आणि सभासदांच्या व गल्लीतील बांधवांच्या उपस्थितीत गणेशोत्सव साजरा करण्यासाठी बैठक मारुती मंदिराच्या सभागृहात घेण्यात आली. बैठकीत गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले. सूत्रसंचालन चंद्रकांत कणबरकर व आभारप्रदर्शन विवेक मोहिते यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Previous post वार्ड क्रमांक 15 मधील रस्त्यांची गणेश उत्सवानिमित्त डागडुजी
Next post विवेकानंद सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत