गणेश चतुर्थी: यशवंतपूर-बेळगावी दरम्यान विशेष रेल्वे सेवा – खासदार ईरन्ना कडाडी
बेळगाव :
गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर दक्षिण पश्चिम रेल्वेच्या महाव्यवस्थापकानी प्रवासी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी विशेष गाडी सुरू करण्याच्या निवेदनाच्या अनुषंगाने यशवंतपूर ते बेळगाव आणि बेळगाव ते यशवंतपूर या दोन गाड्या सुरु करण्यात आल्या आहेत.
राज्यसभा खासदार ईरन्ना काडाडी यांनी सांगितले की, काही दिवसांसाठी विशेष ट्रेन सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत
शनिवारी 09 सप्टेंबर रोजी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात खासदार एरण्णा काडादी यांनी सांगितले की, यशवंतपूर-बेळगावी गाडी (07389) यशवंतपूर स्थानकावरून 15 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 6.15 वाजता सुटेल आणि 16 रोजी सकाळी 6.00 वाजता बेळगावला पोहोचेल.
बेळगाव-यशवंतपूर गाडी (07390) बेळगावहून 16 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5.30 वाजता सुटेल आणि 17 रोजी पहाटे 04.30 वाजता यशवंतपूर स्थानकात पोहोचेल.
यशवंतपूर-बेळगावी गाडी (07391) 17 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6.15 वाजता यशवंतपूर स्थानकावरून सुटेल आणि 18 रोजी सकाळी 6.00 वाजता बेळगावला पोहोचेल.
बेळगाव-यशवंतपूर गाडी (07392) बेळगावहून 18 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5.30 वाजता सुटेल आणि 19 रोजी पहाटे 04.30 वाजता यशवंतपूर स्थानकात पोहोचेल.
प्रवाशांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.