दहावी-बारावी परीक्षांमध्ये मोठा बदल, दरवर्षी 3 परीक्षा

दहावी-बारावी परीक्षांमध्ये मोठा बदल, दरवर्षी 3 परीक्षा

बेळगाव- कर्नाटक :

कर्नाटक शालेय परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाने (Karnataka School Examination Board) दरवर्षी 3 परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे दहावी आणि बारावी परीक्षांमध्ये आमूलाग्र बदल केले आहेत. सध्या संभाव्य परीक्षेचे वेळापत्रक प्रसिद्ध केले असून तीन परीक्षांमध्ये सर्वाधिक गुण निवडण्याची संधी देण्यात आली आहे. सध्या दुसरी बारावी परीक्षा (12th Exam) उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्या मिळवलेले गुण नाकारण्याचा पर्याय उपलब्ध आहे. मात्र, मागील परीक्षेत विद्यार्थ्याला मिळालेले गुण जास्त असले तरी, पुरवणी परीक्षेत मिळालेले गुण हेच विद्यार्थ्याचे खरे गुण मानले जातात (new exam system for SSLC and II PU students).

अशा प्रकारे विद्यार्थ्याला दोन परीक्षांमध्ये आपले सर्वोत्तम गुण मिळवण्याचा पर्याय नाही. शैक्षणिक वर्ष 2023-24 पासून दहावी आणि बारावी विद्यार्थ्यांसाठी 3 वार्षिक परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन पॅटर्ननुसार, तिन्ही परीक्षेत विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणांच्या आधारे उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण होण्याचा निर्णय घेतला जाईल. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना कोणत्याही विषयात कमी गुण मिळाल्यास ते पुन्हा परीक्षा देऊ शकतात. त्यानंतर विद्यार्थ्याला त्याने कोणत्याही परीक्षेत उच्च गुण निवडण्याचे पूर्ण स्वातंत्र्य दिले जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Previous post कारची दुचाकीला जोरदार धडक :भाऊ-बहीण ठार.
Next post खून प्रकरणातील मुख्य संशयित अखेर गजाआड