17 सप्टेंबर पासून विश्वकर्मा योजने होणार प्रारंभ
दिल्ली:
देशभरातील कौशल्यवान नागरिकांच्या आर्थिक मदतीकरिता केंद्र सरकारने पंतप्रधान विश्वकर्मा योजनेला मंजुरी दिली आहे याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 77 व्या स्वातंत्र्य दिना दिवशी लाल किल्ल्यावरून केली होती.
त्यानुसार ही योजना विश्वकर्मा जयंतीच्या दिवशी म्हणजेच 17 सप्टेंबर पासून लागू करण्यात येणार आहे या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस सुद्धा असल्याने हा एक प्रकारचा योगायोग जुळून आला आहे.
यामध्ये फक्त विश्वकर्मा नाही तर सोनार लोहार नावे चांभार यासारख्या पारंपारिक कौशल्य असलेल्या नागरिकांचा समावेश आहे योजनेअंतर्गत एक लाख रुपयांपर्यंतचे कर्ज या समाजाला दिले जाणार आहे.
या आधी मुद्रा योजनेतून अनेक तरुणांनी आपला व्यवसाय सुरू करण्याकरिता वीस लाख कोटी रुपये देण्यात आले आहे. तसेच या योजनेच्या माध्यमातून आठ कोटी नागरिकांना आपला व्यवसाय सुरू केला असून करून दिला आहे. प्रत्येक व्यवसायाने नागरिकांना रोजगार उपलब्ध कारण दिला आहे.