जोहान्सबर्गमध्ये इमारतीला भीषण आग; ५२ जणांचा मृत्यू

जोहान्सबर्गमध्ये इमारतीला भीषण आग; ५२ जणांचा मृत्यू

जोहान्सबर्गमध्ये : दक्षिण आफ्रिकेच्या जोहान्सबर्गमध्ये इमारतीला आज गुरुवारी पहाटे आग लागली. अल्पावधीतच आगीने रौद्ररुप धारण केले. या अग्नितांडवात आतापर्यंत ५२ जणांचा होरपळून मृत्यू झाला असून ४० जण जखमी आहे. अग्निशामक दलाने आगीवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळवले असून शोध आणि बचाव कार्य सुरू आहे.

इंडिया टुडेने याची माहिती दिली आहे. असोसिएटेड प्रेसच्या बातमीनुसार, आपत्कालीन व्यवस्थापन सेवांनी सांगितले की, गुरुवारी पहाटेच्या सुमारास लागलेल्या आगीत आणखी ४३ लोक जखमी झाले आहेत.

अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार आगीचे कारण आणि नुकसानीचा आकडा अद्याप समजू शकलेला नाही. मात्र, आग मोठ्या प्रमाणावर विझवण्यात आली असून शोध आणि बचाव कार्य सुरू आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Previous post रस्त्याच्या मधोमध तरुणाची निर्घृण हत्या
Next post चिंचली मायाक्का भक्तांचा ट्रॅक्टर उलटून युवती ठार