रस्त्याच्या मधोमध तरुणाची निर्घृण हत्या
बेळगाव:
बेळगाव जिल्ह्यातील शिवबसवनगर येथे एका तरुणाची रस्त्याच्या मधोमध निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे.
तरुणाच्या पाठीमागून आलेल्या नराधमांनी रस्त्याच्या मधोमध त्याची हत्या केली. हे दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. 26 वर्षीय नागराज गाडीवड्डर असे मृत तरुणाचे नाव आहे.
रात्री उशिरा ते शिवबसवनगर येथे पायी जात असताना दुचाकीवरून आलेल्या तिघांनी पाठीमागून त्यांच्या डोक्यात कोयत्याने वार करून त्यांचा खून केला. या कृत्यानंतर चोरटे एकामागून एक पळून गेले आहेत.
डीसीपी शेखर, एसीपी कट्टीमणी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी मालमारुती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.