मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर च्या जवानांनी साजरा केला रक्षाबंधन
बेळगाव:
देशाची सेवा करत असताना सैनिक आपले घर, कुटुंबीय यांच्यापासून दूर राहून आपले कर्तव्य बजावत असतात. त्यामुळे सण साजरे करणे प्रत्येक वेळी सैनिकाला शक्य होत नाही. रक्षाबंधन हा सण तर बहीण आणि भावामधील भावनिक जिव्हाळा जपणारा सण. त्यामुळे बेळगावातील शाळा कॉलेज आणि महिलांनी रक्षाबंधन निमित्ताने मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरला भेट देऊन तेथे प्रशिक्षण घेणाऱ्या अग्निविर सैनिकांना, जवानांना आणि अधिकाऱ्यांना राखी बांधून बहीण भावाच्या जिव्हाळ्याच्या नात्याचे दर्शन घडवले.
कुंकुमतिलक लावून ओवाळणी करून विद्यार्थिनी आणि महिलांनी जवानांना राखी बांधली. राखी बांधून त्यांना मिठाई देखील भरवली. घरापासून दूर असून देखील जवानांनी रक्षाबंधन सण साजरा केला.रक्षाबंधन झाल्यावर मराठा सेंटर मधील म्युझियमला विद्यार्थिनी आणि महिलांनी भेट देऊन माहिती घेतली
मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरमध्ये बहीण भावाच्या नात्याचे भावनिक दर्शन घडवणारा रक्षाबंधन कार्यक्रम पार पडला.