मंगाई मंदिरासमोर बांधण्यात आलेली भिंत हटवण्याची मागणी
बेळगाव :
वडगाव येथील मंगाई मंदिरासमोर भर रस्त्यातच भिंत बांधण्यात आली आहे. त्यामुळे मंगाईनगरला जाणाऱ्या नागरिकांसाठी हे त्रासाचे ठरत आहे. अनेक वर्षांपासून हा रस्ता होता. मात्र त्यावर भिंत बांधण्यात आली असून तातडीने ती हटवावी आणि ये-जा करण्यासाठी आम्हाला मार्ग मोकळा करून द्यावा, अशी मागणी मंगाईनगर रहिवासी संघाच्यावतीने महापालिका आयुक्त यांच्याकडे करण्यात आली.
मंगाईनगर-वडगाव या परिसरात ये-जा करण्यासाठी पूर्वीपासून रस्ता होता. मात्र आता या रस्त्यावर काँक्रिटची भिंत बांधण्यात आली आहे. त्यामुळे रुग्णवाहिका, लहान मुले, वृद्धांना तसेच नागरिकांना विष्णू गल्ली, धामणे रोड, ब्रह्मनगर येथून यावे लागत आहे. जवळपास दीड कि. मी. हे अंतर आहे. पूर्वी असलेला रस्ता हा सर्वांना जवळचा संपर्क रस्ता होता. मात्र तो बंद केल्यामुळे समस्या निर्माण झाली आहे. मंगाईनगर येथील दोन तलावाकडे पाटील गल्ली, विष्णू गल्ली, यरमाळ रोड येथील शेतकरी बंधूंना जनावरांना ने-आण करणेदेखील अवघड झाले आहे. मूळ मालक जागा देण्यास तयार आहेत. तेव्हा आम्हाल f बांधण्यात आलेले अतिक्रमण हटवून रस्ता खुला करावा, अशी मागणी करण्यात आली. या निवेदनावर मंगाईनगर परिरसतील तसेच वडगाव परिसरातील नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.