स्कॉर्पिओ आणि कंटेनरमध्ये अपघात, एकाच कुटुंबातील 7 जणांचा मृत्यू
बिहार:
बिहारच्या रोहतास जिल्ह्यामध्ये मोठा अपघात झाला आहे. महिंद्राची स्कॉर्पिओ एसयुव्ही नियंत्रण गमावल्याने हावेच्या बाजुला उभ्या असलेल्या ट्रकवर जाऊन आदळली. यामध्ये सात जणांचा मृत्यू झाला आहे. तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने जखमींना हॉस्पिटलमध्ये हलविले आहे. हा अपघात शिवसागरमध्ये हायवेवर झाला आहे.
झारखंडच्या रांचीमधून एका गावातील लोक प्रवास करत होते. वाटेत चालकाला झोप आली, यामुळे कार अनियंत्रित होऊन रस्त्याकडेला उभ्या असलेल्या ट्रकला जाऊन आदळली. यामध्ये एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी स्कॉर्पिओमध्ये अडकलेल्या लोकांचे मृतदेह बाहेर काढले आणि पोस्टमॉर्टमसाठी पाठवले.
पोलिसांनी या घटनेची माहिती मृताच्या नातेवाईकांना दिली आहे. कुटुंबाला नुकसान भरपाई देण्याची मागणी स्थानिकांकडून केली जात आहे. ट्रकचालक महामार्गाच्या कडेला अनेक ठिकाणी वाहने उभी करून जातात. अंधारामुळे अनेकवेळा चालकाला समोरील ट्रक दिसत नाही. यामुळे असे अपघात होतात, असा आरोप स्थानिकांनी केला आहे.