हिंडलगा येथे सहा हजारचे मद्य जप्त
बेळगाव :
हिंडलगा येथे सहा हजाराचे मद्य व 580 रुपयांची रोख रक्कम जप्त केली. या प्रकरणी संतोष रामचंद्र गोजगेकर (रा. समर्थ कॉलनी, हिंडलगा ) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. सदर व्यक्ती आपल्या घरात मद्य विकत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
समर्थ कॉलनी हिंडलगा येथे दारूची बेकायदा विक्री करणाऱ्या एकाला बेळगाव ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून विविध कंपनीची 17 लिटर दारू, रोकड असा एकूण 6881 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. बेळगाव ग्रामीणचे निरीक्षक मंजुनाथ हिरेमठ, उपनिरीक्षक लक्काप्पा जोडी व त्यांच्या सहकाऱ्यांनी छापा टाकला असता 17 लिटर मद्य आढळून आले. उपनिरीक्षक जोडट्टी तपास करीत आहेत.