अंबाबाईचे दर्शन आता दर्शन अगदी जवळून घेता येणार

अंबाबाईचे दर्शन आता दर्शन अगदी जवळून घेता येणार

कोल्हापूर :

साडेतीन शक्तीपीठापैकी एक प्रमुख पीठ असलेल्या करवीर निवासिनी अंबाबाईचे (Ambabai Mandir) दर्शन गाभाऱ्यात जाऊन घेता येणार आहे. कोल्हापूरचे (Kolhapur) पालकमंत्री दीपक केसरकर यांनी ही माहिती दिली आहे. डोके ठेऊन नतमस्तक होऊन दर्शन घेण्याची भाविक आतुरतेने वाट पाहत होते. कोरोनामुळे बंद असलेले अंबाबाईचे गाभारा दर्शन 29 ऑगस्ट सुरू करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

कोरोना संसर्गजन्य रोगाचे सावट पसरले होते. या पार्श्वभूमीवर शासनाने खबरदारीचा उपाय म्हणून सर्व धार्मिक स्थळे भाविकांच्या दर्शनासाठी बंद केली होती. दरम्यान काही महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाल्याने पुन्हा एकदा मंदिरे भाविकांच्या दर्शनासाठी खुली करण्यात आली. मात्र अंबाबाईचे दर्शन पितळी उंबऱ्याच्या बाहेरून घ्यावे लागत होते. मात्र भाविकांना आई अंबाबाईचे दर्शन अगदी जवळून घेता येणार आहे. मात्र भाविकांना देवीच्या पायावर डोके ठेऊन दर्शन घेण्याची आस लागून होती..

गाभार दर्शन सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याची माहिती दिपक केसरकर यांनी दिली आहे. या निर्णयामुळे भाविकांना थेट मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन अंबाबाईचे दर्शन घेता येणार आहे. तसेच देवीची ओटी देखील भरता येणार आहे. कोरोना काळापासून मुखदर्शन सुरू करण्यात आले होते. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर गाभाऱ्यात दर्शन सुरू करावे अशी मागणी भाविकांकडून होत होती. कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात गर्दीचा ओघ कायम आहे. सुट्टीच्या दिवशी तर मंदिर भाविकांनी हाऊसफुल्ल असते. श्रावण महिन्यामुळे करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Previous post केएसआरटीसी बस- मोटार अपघात सहा जणांचा जागीच
Next post हिंडलगा येथे सहा हजारचे मद्य जप्त