केएसआरटीसी बस- मोटार अपघात सहा जणांचा जागीच

केएसआरटीसी बस- मोटार अपघात सहा जणांचा जागीच मृत्यू

बंगळूर :

रामनगर जिल्ह्यातील सतनूरजवळ केएसआरटीसी बस आणि मोटारची समोरासमोर धडक झाली आणि या भीषण अपघातात कारमधील सहा जणांचा जागीच मृत्यू झाला.

केएसआरटीसी बस आणि क्वालीस मोटारमध्ये दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला.क्वालिसमधील सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. कारच्या मागील सीटवरील अनेकांना गंभीर दुखापत झाली. कनकपूर तालुक्यातील सतनूरजवळील केमाळे गेटजवळ हा अपघात झाला. महाडेश्वर टेकडीवरून मागून येणारी क्वालिस मोटार भरधाव वेगात येऊन बसला धडकली. बसच्या चालकासह अनेक प्रवासी किरकोळ जखमी झाले. सातनूर पोलिस घटनास्थळी दाखल झाले.

गाडीतील सर्व लोक मित्र होते, सर्वजण मिळून

 

महाडेश्वराच्या दर्शनासाठी महाडेश्वर टेकडीवर गेले होते. दर्शन करून परतत असताना हा अपघात झाला. नागेश, पुट्टाराजू, जोथिर्लिंगप्पा (कार मालक), गोविंदा आणि कुमार अशी मृतांची नावे आहेत. हे सर्व बंगळुर येथील असल्याची माहिती आहे. गाडी म्हैसूरकडून येत होती. ही बस सतनूरहून म्हैसूरच्या दिशेने जात होती. समोरासमोरील मोटारीचा चक्काचूर झाला.

मोटार आणि बस यांच्यात झालेल्या धडकेमुळे मोटारचा अर्धा भाग बसच्या मागील बाजूस घुसला आहे. मृतदेह बाहेर काढण्यासाठी पोलिसांची धडपड सुरू आहे. जेसीबी आणि क्रेन घटनास्थळी आणण्यात आल्या आहेत. कारचा काही भाग पूर्णपणे चक्काचूर झाल्याने मृतदेह बाहेर काढणे अवघड झाले.

मोटारच्या पाठीमागे बसलेल्या आणि केएसआरटीसी बसमध्ये बसलेल्या गंभीर जखमींना रुग्णवाहिके द्वारे जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Previous post घुटमाळ मारुती मंदिरात नवीन मूर्तीची प्रतिष्ठापना 
Next post अंबाबाईचे दर्शन आता दर्शन अगदी जवळून घेता येणार