नियती कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या चेअरपर्सन पदी डॉ सोनाली सरनोबत यांची बिनविरोध निवड.
बेळगाव:
नुकतीच नियती कोऑपरेटिव्ह सोसायटीची निवडणुक प्रक्रिया पार पडली. त्या मधे डॉ सोनाली सरनोबत व श्री. भरत राठोड यांची चेअरपर्सन व व्हाईस चेअरमन म्हणून अनुक्रमे सर्व सदस्यानुमते निवड करण्यात आली आहे. त्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
नियती सोसायटीची स्थापना कोरोना काळात करण्यात आली. डॉ सोनाली सरनोबत यांच्या पुढाकाराने या सोसायटीची स्थापना करण्यात आली.
बेळगांव चेंबर ऑफ कॉमर्स चे माजी अध्यक्ष श्री रोहन जुवळी यांनी चेअरमन व प्रख्यात डॉक्टर डॉ समीर सरनोबत यांनी व्हाईस चेअरमन म्हणून धुरा सांभाळली व अल्पावधीतच सोसायटी नफ्यात आणली. श्री अनुप जवळकर ( प्रख्यात बिल्डर), श्री रोहीत देशपांडे (उद्योगपती), श्री भास्कर पाटील (वकील), श्री प्रकाश मुगळी (उद्योगपती), श्री नरसिंह जोशी (कर सल्लागार), श्री गजानन रामनकट्टी (उद्योजक), श्री प्रसाद घाडी (उद्योजक), भुषण रेवणकर(उद्योजक), सौ सुनीता पवार ( उद्योजिका), सौ वरदा हप्पळी (उद्योजिका), सौ मंजुळा हेगडे ( महिला मंडळ समन्वयक) यांची निर्देशक म्हणून निवड झाली आहे.
चीफ मॅनेजर सौ अनुषा जोशी व सौ. दीपा प्रभुदेसाई उपस्थीत होत्या.सल्लागार म्हणून माजी महापौर विजय मोरे, कर सल्लागार संदीप खन्नुकर, सविता कांबळे, नागरत्ना रामगोंडा, किशोर काकडे,मिलींद पाटील, शितल चिलमी यांनी काम पाहीले.
सोसायटीच्या दोन शाखा आहेत. प्रमुख शाखा पि. एन . गाडगीळ गोल्ड शोरूम च्या ईमारती मधे दुसर्या मजल्यावर असुन दुसरी शाखा फुलबाग गल्ली मधे आहे. तिसरी शाखा खानापुरात लवकरच सुरू होत आहे.