25 ऑगस्ट पासून शहराला 3 दिवस पाणी नाही

25 ऑगस्ट पासून शहराला 3 दिवस पाणी नाही

बेळगाव:

हिडकल डॅम येथील विद्युत केंद्राच्या ठिकाणी येत्या 25 ऑगस्ट रोजी नियतकालिक दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार असल्यामुळे स्कॉमकडून 10 एमव्हीए 110 / 33केव्ही पॉवर ट्रान्सफॉर्मर बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे येत्या शुक्रवार दि. 25 ते रविवार दि. 27 ऑगस्ट 2023 या कालावधीत शहराचा पाणी पुरवठा खंडित होणार आहे.

बेळगाव शहराची पाणीपुरवठा व्यवस्था सांभाळणाऱ्या एल अँड टी कंपनीने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. हेस्कॉमचा 10 एमव्हीए 110 / 33 केव्ही पॉवर ट्रान्सफॉर्मर हा संपूर्ण बेळगाव शहराला पाणी पुरवठा करण्यासाठीचा एकमेव ट्रान्सफॉर्मर आहे.

तो बंद ठेवण्यात येणार असल्यामुळे उपरोक्त कालावधीत बेळगावला पाणी पुरवठा करणाऱ्या कुंदर्गी आणि तुम्मरगुद्दी पंप हाऊसचा वीजपुरवठा बंद असणार आहे. परिणामी 25 ते 27 ऑगस्ट या कालावधीत बेळगाव शहरातील 24 तास पाणी पुरवठा डेमो झोनसह विविध भागातील पाणीपुरवठा खंडित असणार आहे.

पाणी पुरवठा खंडित असणारे भाग पुढील प्रमाणे आहेत. बेळगाव दक्षिण : मजगाव, नानावाडी, चिदंबरनगर, शहापूर, वडगाव, जुने बेळगाव. बेळगाव उत्तर : सह्याद्रीनगर कुवेंपूनगर, टीव्ही स्टेशन, सदाशिवनगर, बसव कॉलनी,कलमेश्वरनगर, सुभाषनगर, अशोकनगर, एम. एम. बडवाने एरिया, न्यू गांधीनगर, कणबर्गी, कुडची. शहराचे अन्य भाग : कॅन्टोन्मेंट प्रदेश, हिंडाल्को फॅक्टरी, केएआयडीबी औद्योगिक वसाहत, इन रूट व्हिलेज टॅपिंग, डिफेन्स एरिया,सैनिकनगर,केएलई हॉस्पिटल, बिम्स हॉस्पिटल आदी भाग. तरी नागरिकांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन एल अँड टी पाणीपुरवठा बेळगावच्या महाव्यवस्थापकांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Previous post छत्तीसगडमध्ये भाजपच्या विजयी रथाला अभय सारथी.
Next post गणेश उत्सवासाठी 15 दिवस आधी ‘सिंगल विंडो’ – पोलीस आयुक्त