उप्पीटमध्ये विष घालून पतीचा खून करण्याचा प्रयत्न
बेळगाव :
उप्पीटमध्य विष घालून पतीचा खून करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकरण, गोरेबाळ (ता. सौंदत्ती) येथे उघडकीस आले आहे. निंगाप्पा फकिराप्पा हमानी (वय 35, गोरेबाळ) असे अत्यवस्थ झालेल्याचे नाव आहे. तर या प्रकरणात निंगाप्पाची पत्नी आणि तिच्या भावाविरुद्ध (निंगाप्पाचा मेहुणा ) गुन्हा दाखल केला आहे.
अधिक माहिती अशी, विषमिश्रित उप्पीट खाल्यामुळे निंगाप्पा 11 ऑगस्ट रोजी अत्यवस्थ झाले. त्यासाठी हुबळीतील किम्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. निंगाप्पा याची पत्नी सावक्का व तिचा भाऊ फकिराप्पा लक्ष्मण सिंधूगीने मिळून हत्येचा कट रचला होता. निंगाप्पाच्या नावे गावात दोन एकर शेती आहे. शेतजमीन हडप करण्यासाठी निंगाप्पाचा खून करण्याचे ठरले. यासाठी उप्पीटमध्ये विष घालून त्याचा खून करण्याचे नियोजन होते. त्यानुसार 11 रोजी उप्पीटमध्ये विष घालून निंगाप्पाला खायाला दिले. ते खाल्यामुळे निंगाप्पा अत्यवस्थ झाले.
वैद्यकीय उपचारासाठी त्याला हुबळीत दाखल केले आहे. अद्याप प्रकृती अद्याप स्थिर नाही. चौकशीदरम्यान मिळालेल्या माहिती आधारे पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिस चौकशीत मालमत्ता हडपण्यासाठी बहीण आणि भावाने मिळून कट रचल्याचे पोलिसांनी सांगितले.
विषमिश्रित उप्पीटमुळे सौदत्ती येथील निंगाप्पा हमानी अत्यवस्थ आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दुसरीकडे हेच उप्पीट कुत्रे आणि मांजराने खाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती चौकशीत पोलिसांना मिळाली आहे.