उचगाव येथील मारुती मंदिरात चोरी
उचगाव येथील मारुती मंदिरात चोरी
बेळगाव :
गुरुवारी सकाळी उचगावातील मारुती मंदिरात चोरट्यांनी दानपेटी फोडून त्यातील रक्कम लंपास केल्याची घटना उघडकीस आली. ही चोरी बुधवारी रात्री झाली आहे. गावच्या मध्यवर्ती चौकात मारुतीचे मंदिर आहे. त्याचासमोरचा दरवाजा फोडून चोरट्यांनी मंदिरात प्रवेश केला. याठिकाणी गावकऱ्यांची सतत वर्दळ असते.
गुरुवारी सकाळी सदर घटना उघडकीस आल्यानंतर काकती पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी तत्काळ मंदिरात येऊन पंचनामा केला. पुढील तपास करण्यात येत आहे.