बेळगाव शहराच्या काही भागाला पाणीपुरवठा होणार नाही.

बेळगाव शहराच्या काही भागाला पाणीपुरवठा होणार नाही.

बेळगाव :

लक्ष्मीटेकजवळील 450 मिमी आकाराच्या मुख्य जलवाहिनीला कॅम्पजवळ गळती लागली असून, दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे बेळगाव शहराच्या काही भागाला शनिवारी व रविवारी पाणीपुरवठा होणार नाही.

मजगाव, नानावाडी, चिदंबरनगर, शहापूर, वडगाव, हिंदवाडी, चन्नम्मानगर पहिले व दुसरे स्टेज, राजारामनगर, बी मंग्रिसी कॉलनी, महावीरनगर, मँगो मेडोस, कलमेश्वर सोसायटी, अनगोळ आदी भागासह तेथील 24 तास योजनेचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. नागरिकांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे कर्नाटक शहर पायाभूत सुविधा विकास व वित्त महामंडळ (केयुआयडीएफसी) बेळगाव विभा व्यवस्थापकांनी केले आहे.

राकसकोप जलाशय पंधरवड्यापूर्वी तुंडूब झाल्यापासून शहराला सुरळीतपणे पाणीपुरवठा सुरु होता. पाणीही मुबलक मिळत होते. आता जलवाहिनीला गळती लागल्याने शहराच्या काही भागाला पावसाळ्यातही पाणीटंचाईला तोंड द्यावे लागणार आहे. एल & टी कंपनीने जलवाहिन्यांची वेळोवेळी तपासणी करावी. जीर्ण जलवाहिन्या बदलून नव्या जलवाहिन्या जोडण्याचे काम यापूर्वीच करणे आवश्यक होते. नव्या जलवाहिन्या जोडणे, आवश्यक असणाऱ्या भागात काम त्वरित हाती घ्यावे. त्यामुळे सणासुदीच्या काळात शहराला पाणीटंचाई भासणार नाही, अशा प्रतिक्रिया जनतेतून व्यक्त होत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Previous post कणकुंबी तपासणी नाक्यावर 27 लाख किंमतीची दारू जप्त 
Next post बालचंद्र साहूकर बेळगावातून थांबण्याची शक्यता