कणकुंबी तपासणी नाक्यावर 27 लाख किंमतीची दारू जप्त 

कणकुंबी तपासणी नाक्यावर 27 लाख किंमतीची दारू जप्त

खानापूर :

दारूची बेकायदेशीर वाहतूक केल्याप्रकरणी अबकारी खात्याच्या अधिकाऱ्यांनी एकूण 52 लाख 52 हजार 398 रुपये किमतीच्या गोवा येथून येणारा अशोक लेलँड कंपनीचा 12 चाकी ट्रक (जे. जी. 03, बी. टी. 6735) यामध्ये एकूण 1093.4 लिटरची दारूसह अबकारी खात्याच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी सायंकाळी सुरल क्रॉस येथे ही कारवाई केली.

या कारवाईत एकूण 27 लाख 52 हजार 398 रुपये किमतीची गोवा बनावटीची दारू आणि 25 लाख रुपये ट्रकची (अंदाज किंमत) असा एकूण 52 लाख 52 हजार 398 रुपये जप्त केले. याप्रकरणी प्रदीप कुमार भगवती प्रसाद रा. धनुही, उत्तर प्रदेश या वाहन चालकांसह रामचंद्र राम निहाल रा. उत्तर प्रदेश (क्लीनर) या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

अबकारी अप्पर आयुक्त वाय. मंजुनाथ, सहआयुक्त फिरोज खान किल्लेदार यांच्या आदेशानुसार अबकारी उपायुक्त वनजाक्षी एम., रवी मुरगोड आदींच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Previous post बेळगाव मनपा आयुक्तांचे महत्वपूर्ण आवाहन
Next post बेळगाव शहराच्या काही भागाला पाणीपुरवठा होणार नाही.