बेळगाव मनपा आयुक्तांचे महत्वपूर्ण आवाहन
बेळगाव :
शहरातील नागरिकांनी ओला, सुका आणि घातक कचरा वेगवेगळा करून बेळगाव स्वच्छ शहर बनवण्यासाठी कचरा गोळा करणाऱ्यांना द्यावा आणि घनकचरा विल्हेवाट नियम 2016 च्या योग्य अंमलबजावणीसाठी सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका आयुक्त अशोक दुडगंटी यांनी केले आहे.
महापालिकेने घरोघरी जाऊन कचरा उचलण्याबाबत प्रभागनिहाय निवासी भागात सकाळी आणि व्यावसायिक भागात सायंकाळी कचरा उचलण्यासाठी वाहने नियुक्त केली आहेत. मात्र अनेक ठिकाणी नेमून दिलेल्या वाहनांपर्यंत कचरा पोहोचवला जात नाही.
काही लोक व व्यावसायिक दुकानमालक आपल्या घरातील किंवा दुकानांमध्ये निर्माण होणारा कचरा रस्त्याच्या कडेला व मोकळ्या जागेवर टाकत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे शहराचे सौंदर्य आणि शहरवासीयांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे
घनकचरा विल्हेवाट नियम 2016 आणि राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या निर्देशांनुसार, सर्व जनतेला त्यांचा दैनंदिन कचरा ओला कचरा, सुका कचरा आणि घातक कचरा असे वर्गीकरण करून कचरा गोळा करणाऱ्यांना देणे बंधनकारक आहे.
या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना घनकचरा विल्हेवाटीच्या उपविधीनुसार दंड आकारण्यात येईल. महापालिकेच्या बाबतीतील खासगी मोकळ्या जागेची साफसफाई मालकाने स्वतः करावी.
अन्यथा या खाजगी जागांची महापालिका स्वच्छता करणारा असून त्याचा खर्च मालकाकडून आकारण्यात येईल अशा सूचनाही आयुक्तांनी केल्या आहेत.