वहिनी वर चुकीचा नजर…मित्राचा केला खून..
बेळगाव : एका मित्राने दुसऱ्या मित्राचा खून बेळगाव तालुक्यात केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. भावाच्या पत्नीसोबत सलगी करतो, तिच्याशी वारंवार फोनवर बोलत असल्याच्या रागातून एकाने तरुणाचा चाकूने भोसकून निर्घृण खून केला. अभिषेक अप्पय्या बुड्री (वय 19, रा. हुल्यानूर, ता. बेळगाव) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी होळाप्पा बसप्पा करीकट्टी (वय 23, रा. हुल्यानूर) या संशयिताला अटक केली आहे. याप्रकरणी मारिहाळ पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांतून समजलेली अधिक माहिती अशी : अभिषेकने संशयित होळप्पाच्या भावाच्या पत्नीसोबत सलगी केली होती. तसेच तिच्याबरोबर तो वारंवार फोनवर बोलत असल्याची माहिती होळाप्पाला समजली होती. त्यामुळे तो त्याच्यावर चिडून होता. बुधवारी रात्री 11.30 च्या सुमारास होळाप्पाने अभिषेकला तुझे वागणे बरोबर नाही, असे म्हणत त्याच्याशी वाद घातला. त्याचे रूपांतर हाणामारीत झाले.
यावेळी संशयित होळाप्पाने अभिषेकवर चाकूने सपासप वार केले. त्यात तो गंभीर जखमी झाल्याने नातेवाइकांनी त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, शनिवारी सकाळी सहाच्या सुमारास त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी मारहाळ पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तातडीने तपास करत संशयित होळाप्पाला अटक केली. जिल्हा रुग्णालयामध्ये वैद्यकीय तपासणी करून न्यायालयासमोर हजर केले असता त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली.