बेळगावातील आझम नगर येथे शॉर्ट सर्किटमुळे तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू
बेळगाव :
बेळगाव शहरातील शाहूनगर, आझम नगर भागात शॉर्ट सर्किटमुळे तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज शनिवार दि. १२ रोजी सकाळी घडली. मृतांत आई, वडील आणि मुलगीचा समावेश आहे. ते लमानी समाजातील एकच कुटुंबातील आहेत.
पाणी गरम करायची कॉइल काढतेवेळी शॉक लागल्याने तिघांचा मृत्यू झाल्याची घटना एपीएमसी पोलिस स्थानकाच्या व्याप्तीमध्ये घडली आहे. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेऊन चौकशी करण्यास सुरुवात केली आहे. एका बांधकाम सुरु असलेल्या घरात हे कुटुंब वाचमन म्हणून काम करत होते. सकाळी घरामध्ये पाणी गरम करण्यासाठी असलेली कॉइल काढताना ही घटना घडली आहे. इराप्पा गणगप्पा लमानी (वय 50), पत्नी शांता (वय 45) आणि नात अन्नपूर्णा मुन्नाप्पा लमानी (वय 7, सर्व रा. रामदुर्ग तालुका अरबेंची तांडा) अशी मृतांची नावे आहेत. नेमकी घटना कशी घडली याची चौकशी पोलीस करत आहेत; त्यानंतर नेमके कारण आणि मयतांची नावे समोर येणार आहेत.
घटनेचा पंचनामा करत मृतदेह ताब्यात घेतले आणि शवविच्छेदनासाठी मृतदेह रुग्णालयात पाठवला. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. या दुर्दैवी घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस प्रशासन करत आहे.