इनरव्हील क्लब ऑफ बेळगावतर्फे जागतिक स्तनपान सप्ताह

इनरव्हील क्लब ऑफ बेळगावतर्फे जागतिक स्तनपान सप्ताह

बेळगाव :

इनरव्हील क्लब ऑफ बेळगावतर्फे जागतिक स्तनपान सप्ताह साजरा करण्यात आला. यानिमित्त केएलईच्या येळ्ळूर चॅरिटेबल हॉस्पिटल येथे प्रा. डॉ. सोनाली बिज्जरगी यांचे नोकरदार मातांनी स्तनपानाचे व्यवस्थापन कसे करावे, याबद्दल व्याख्यान झाले. तर डॉ. गितांजली तोटगी यांनी स्तनपान कसे करावे, याबद्दल माहिती दिली. मात्र कोणत्याही परिस्थितीत आपल्या बाळाला स्तनपान देण्याचे टाळू नये, असे डॉक्टरांनी सांगितले.

क्लबतर्फे हॉस्पिटलमधील नवजात शिशुंच्या मातांना खजूर, प्रोटीन पावडर व त्यांच्या बाळांसाठी कपडे देण्यात आले. एकूण ५० मातांना हे साहित्य वितरीत करण्यात आले. याप्रसंगी अध्यक्षा मंजिरी पाटील यांनी या उपक्रमाचा हेतू स्पष्ट केला. इव्हेंट चेअरमन डॉ. रचना शानभाग, वीणा शहा, गीता पोतदार यावेळी उपस्थित होत्या. योगिनी नाईक यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Previous post गुरूवारी बेळगावच्या या भागात होणार वीज पुरवठा खंडित
Next post काँग्रेसचे प्रधानमंत्री उमेदवारीचे दावेदार….