गुरूवारी बेळगावच्या या भागात होणार वीज पुरवठा खंडित
हेस्कॉमने गुरुवार दिनांक 10 रोजी विविध भागात वीज पुरवठा खंडित करण्याचे घोषित केले आहे. दुरुस्तीच्या कारणास्तव बेळगाव दक्षिण भागातील वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी याची दखल घ्यावी असे आवाहन हेस्कॉमतर्फे करण्यात आले आहे.
सकाळी सहा ते दुपारी एक वाजेपर्यंत वीजपुरवठा बंद करण्यात येणार आहे. दरम्यान औद्योगिक वसाहतीमध्ये ही हा वीज पुरवठा खंडित केला जाणार आहे.
खानापूर रोड, उद्यमबाग, राणी चन्नम्मा नगर, तिसरे रेल्वे गेट, सुभाषचंद्र कॉलनी, औद्योगिक परिसर, जीआयटी कॉलनी परिसर, विश्वकर्मा कॉलनी, स्वामीनाथ कॉलनी, नित्यानंद कॉलनी, डिफेन्स कॉलनी, वाटवे कॉलनी, जैतन माळ, महावीर नगर, खानापूर रोड ज्ञान प्रबोधन शाळा परिसर, गुरूप्रसाद कॉलनी,मंडोळी रोड, कावेरी कॉलनी, पार्वती नगर आदी भागात हा वीज पुरवठा खंडित केला जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी व उद्योजकांनी याची नोंद घ्यावी आणि सहकार्य करावे असे आवाहन स्कॉम तर्फे करण्यात आले आहे.