रामनगर येथे 6 लिटर गोवा बनावटीची दारू जप्त :बस चालकांवर गुन्हा दाखल

रामनगर येथे 6 लिटर गोवा बनावटीची दारू जप्त :बस चालकांवर गुन्हा दाखल

खानापूर :

गोवा येथून बागलकोटच्या दिशेने जाणाऱ्या बसमध्ये 6 लिटर गोवा बनावटीची दारू आढळल्याने बस चालकांवर गुन्हा दाखल केला. वास्को येथून जाणाऱ्या बागलकोट डेपोच्या बसमधून दारूसाठा नेत असल्याची खबर याच बसमधून जाणाऱ्या एका प्रवाशाने कारवार येथील मुख्य पोलीस कार्यालयाला फोनद्वारे कळविल्याने थेट कारवारवरूनच याची खबर पोलिसांना दिली.

पोलिसांनी रामनगर चौकात बस थांबवून तपासणी केली असता यामध्ये गोवा बनावटीची सहा लिटर दारू आढळून आली. दारूची अंदाजे किंमत ₹3000 रुपये केली आहे. त्यामुळे सदर बस चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला. सदर बस रामनगर पोलिसांनी जप्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Previous post बेळगावी कॅम्प पोलिस स्टेशनला ताडपत्रीचे सुरक्षा!!!
Next post राज्य रोलर स्केटिंग चैम्पियनशिप 2023 मध्ये बेळगाव चमकला.