अज्ञात वाहनाने धडक दिल्याने ककती जवळ तरुण ठार
बेळगाव :
अज्ञात वाहनाने धडक दिल्याने तरुण ठार झाल्याची घटना रविवारी रात्री 10.30 च्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावर काकतीत घडली. सत्याप्पा हनुमंत बुदीहाळ (वय 35, रा. जनता प्लॉट, देवगिरी) असे मृताचे नाव आहे. याबाबत काकती पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सत्याप्पा हा रविवारी रात्री काकतीतील एका ठिकाणी घराकडे जाण्यासाठी थांबला होता.
यावेळी महामार्गावरुन बेळगावहून संकेश्वरकडे निघालेल्या अज्ञात वाहनाने त्याला जोराची धडक दिली. यामध्ये गंभीर दुखापत होऊन सत्याप्पा हा जागीच ठार झाला. घटनेनंतर वाहन फरारी झाल्याने त्याचा तपशील मिळू शकला नाही. मृताचा भाऊ भरमाने दिलेल्या फिर्यादीवरुन काकती पोलिसांत घटनेची नोंद झाली आहे. पोलिस निरीक्षक विजयकुमार सिन्नूर तपास करीत आहेत.