बेळगाव महपालिके कडून बेळगाव दक्षिणसाठी 7 नवीन कचरा गाडी.
बेळगाव:
बेळगाव दक्षिणेचे आ.अभय पाटील पुढाकार घेवून हे नेहमी स्वच्छता अभियान राबवत असतात. बेळगाव दक्षिण येथील सर्व वॉर्ड येथील व्यावसायिक वर्ग उशीरा दुकान उघडल्या मुळे त्यांचा कचरा उचलण्यासाठी महापालिकेला अवघड होत होता म्हणून आ.अभय पाटील यांच्या पुढाकाराने,नगररचना व विकास स्थायी समितीचे अध्यक्ष रवी धोत्रे यांच्या नेतृत्त्वाखाली आणि सर्व नगरसेवकांच्या मागणी अनुसार, महापालिका चे आयुक्त अशोक दुडगुंठी यांचा सहकार्याने एकूण 12 नवीन कचरा उचलणारी गाडी मंजूर केले.
मंगळवारी दि. 7 ऑगस्ट रोजी ,वॉर्ड क्र.42 चे नगरसेवक अभिजीत जवळकर आणि वॉर्ड क्र.43 चे नगरसेविका यांच्या हस्ते बेेेळगाव दक्षीणसाठी 7 गाड्यांना चालना दिली.
हे गाडी संध्याकाळी 6 ते रात्री 11 पर्यंत व्यावसायिक दालनाचे कचरा उचलतील असे स्थायी समितीचे अध्यक्ष रवी धोत्रे यांनी माहिती दिली. नगरसेवक अभिजीत जवळकर यांनी सर्व व्यावसायिक लोकांना या सोयीचा उपयोग करावेत असे आवाहन केले.
कार्यक्रमाला नगरसेवक अभिजीत जवळकर,नगरसेविका वाणी जोशी, नितीन जाधव,आनंद चव्हाण,रवी धोत्रे,बरोबर महानगर पालिकेचे अधिकारी आणि कामगार वर्ग उपस्थित होते.