महापौर शोभा सोमणाचे,नगरसेवक आणि अधिकाऱ्यांची श्रीमूर्ती विसर्जन तलावांना भेट
बेळगाव :
19 सप्टेंबर पासून गणेशोत्सवाला प्रारंभ होत आहे. 28 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी आहे. या पार्श्वभूमीवर बेळगाव महापालिकेने तब्बल दीड महिना आधीच श्रीमूर्ती विसर्जना संदर्भात हालचाली सुरू केल्या आहेत.
महापौर शोभा सोमणाचे तसेच काही नगरसेवक आणि अधिकाऱ्यांनी आज सोमवारी दक्षिण भागातील विविध ठिकाणच्या श्रीमूर्ती विसर्जन तलावांना भेट देऊन तेथील कामकाजांची माहिती घेतली. महानगरपालिकेच्या बैठकीत पुढील महिन्यात होणाऱ्या गणेशोत्सवा संदर्भात विशेष दखल घेण्यात आली आहे. श्रीमूर्ती विसर्जन तलावांच्या सुधारणेसाठी निधी राखीव ठेवण्यात आला आहे. श्रीमूर्ती विसर्जन चांगल्या पद्धतीने व्हावे यासाठी महापालिकेच्या वतीने विशेष काळजी घेतली जात आहे. त्यामुळेच तब्बल दीड महिना आधीच श्रीमूर्ती विसर्जन तलाव परिसरात हाती घेण्यात येणाऱ्या विविध कामांची आज महापौर शोभा सोमनाथ यांनी माहिती घेतली. यावेळी त्यांच्यासोबत स्थायी समिती अध्यक्षा वाणी जोशी, नगरसेवक मंगेश पवार, गिरीश धोंगडी यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. दक्षिण विभागातील कपिलेश्वर तलाव, रामतीर्थ तलाव, अनगोळ तलाव, वडगाव तसेच जुने बेळगाव येथील तलावांना भेट देऊन तेथे हाती घेण्यात येणाऱ्या कामाबाबत पाहणी करण्यात आली आहे.