न.से.श्रीशैल कांबळेे यांच्या पुढाकाराने संतमिरा शाळे कडचा रस्ता दुरूस्त .
बेळगाव:
वॉर्ड क्र.51 वसाहतीत असलेल्या संतमीरा शाळे समोरच्या रस्त्यांची दुरवस्था झाली होती. चिखल निर्माण होऊन लहान मुलांना व रहिवाशांना त्रास होत आहे. त्यामुळे किमान खडी घालून तात्पुरती दुरुस्ती तरी करून द्यावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केल वॉर्ड क्र.51 चे नगरसेवक श्रीशैल कांबळेे यांच्या कडे व्यक्त केली होती.
नगरसेवक श्रीशैल कांबळेे यांनी त्वरीत आ. अभय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खडी ची व्यवस्था करून आज रस्त्याची दुरुस्ती केली. या उपक्रमाच्या वेळी नगरसेवक श्रीशैल कांबळेे, अधिकारी परशुराम ( AEE) ,अजय चव्हाण (AE) ,जितेंद्र देवन व इतर प्रतिष्ठीत नागरिक उपस्थित होते.
अनगोल रहिवासी आ. अभय पाटील आणि नगरसेवक श्रीशैल कांबळेे यांच्या या कामाचं समाधान व्यक्त केले आणि यांचे आभार मानले.