हेस्काँमचे गैर करबार…..
कर्नाटक सरकारने जाहीर केलेल्या गृह ज्योति योजनेत गौडबंगल आहे. बेळगाव येथील एका ग्राहकाला दोन महिन्यात दोन वेगळे वेगळे अवरेज बिल मध्ये दाखवण्यात आले आहे. जून महिन्याच्या बिल मध्ये अवरेज वेगळा आणि जुलैचा बिल मध्ये वेगळा आहे. एकूण लोकांना काँग्रेस सरकारने फसवलेला आहे असे मत लोकांकडून ऐकला मिळतोय.
कर्नाटक सरकारने जाहीर केलेल्या गृह ज्योति योजनेचा अर्ज भरणा सुरू झाल्यानंतर नागरिकांची धावपळ सुरू झाली होती. या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक असणारे लाभार्थी संबंधित केंद्रांवर गर्दी करत असल्याचे दृश्य दिसून येत होतेे.पाच गॅरंटी योजनांपैकी एक असणाऱ्या गृहज्योती योजनेला प्रारंभ झाला आणि बेळगावमधील नागरिकांनी नावनोंदणी करण्यासाठी बेळगाव वन कार्यालयांमध्ये तुफान गर्दी केली होती… निवडणुकीपूर्वी काँग्रेस पक्षाने राज्यात सत्तेत आल्यावर पाच गॅरंटी योजना राबविण्याचे आश्वासन दिले होते. घरगुती वीजजोडणी असणाऱ्या ग्राहकांना 200 युनिटपर्यंत मोफत वीज देण्याची घोषणा करण्यात आली होती. घरमालकासह भाडेकरूंनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे.