हिंडलगा कारागृहातील कैद्याविरुद्ध गुन्हा दाखल

हिंडलगा कारागृहातील कैद्याविरुद्ध गुन्हा दाखल

बेळगाव –

हिंडलगा कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कैद्याचे व्हिडिओ चित्रीकरण केल्याप्रकरणी बेळगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात एका कैद्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रशांत शेखर मुगवीर असे गुन्हा दाखल झालेल्या कायद्याचे नाव आहे.

प्रशांत मुघवीर याला कुंदापूर जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. हिंडलगा कारागृहात असताना प्रशांतने तुरुंगातील कर्मचारी अधिकाऱ्यांशी बोलत असल्याचा व्हिडिओ बनवला होता. एका खाजगी कन्नड वृत्तवाहिनीला हा व्हिडिओ 3 ऑगस्ट रोजी प्रसारित करण्यात आला होता. कारागृहात मोबाईल सारख्या इलेक्ट्रॉनिक साहित्याच्या वापरावर निर्बंध. व्हिडीओ चित्रीकरण करून तो सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी कारागृहाचे सहायक अधीक्षक शहाबुद्दीन के. त्यांनी बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Previous post आर. पी. डी. क्रॉस येथील बेघर वृद्धाला केली मदत
Next post 65 वर्षीय प्राचार्य कडून तरुणीवर बलात्कार