आर. पी. डी. क्रॉस येथील बेघर वृद्धाला केली मदत

आर. पी. डी. क्रॉस येथील बेघर वृद्धाला केली मदत

बेळगाव:

बेळगाव शहरात सर्रास माणुसकी जपणाऱ्या घटना दररोज नित्य नियमाने घडत असतात शुक्रवारी सायंकाळी देखील अशीच एक घटना आरपीडी कॉर्नर वर घडली त्या घटनेतून माणुसकी जपण्याचा संदेश मिळाला.

आरपीडी क्रॉस येथील बस स्टॉप परिसरात एक वृद्ध बेघर माणूस झोपला होता. तो आजारी होता त्याला खूप बरे वाटत नव्हते तो झोपलेल्या अवस्थेत होता त्याला जाग येत नव्हती त्यावेळी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी आरपीडी क्रॉस सिग्नलवर उपस्थित असलेल्या वाहतूक पोलिस संतोष एस भावी यांना त्याची माहिती दिली.

सदर रहदारी पोलिसाने तात्काळ फोन करून टिळकवाडी पोलिस स्टेशनला याची माहिती दिली त्यानंतर टिळकवाडी पोलीस प्रभाकर जी डोळी राजेश्वरी बिरादार घटनास्थळी पोहोचले. पोलीस संतोष यांनी वृद्ध व्यक्तीला खायला दिले आणि १०८ रुग्णवाहिकेला फोन केला.

तेवढ्या 15 मिनिटांत रुग्णवाहिका पोहोचली त्या व्यक्तीला उपचारासाठी बेळगावच्या बिमस् हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. वृद्धाला इस्पितळात हलवतेवेळी त्याला जाग येत नव्हती आणि तो जागेवर उठत नव्हता.

त्यावेळी प्राध्यापक भरमा कोळेकर यांनी अलगदपणे त्या बेघर वृद्धाला हाताने अदांतरी उचलून रुग्णवाहिकेत ठेवले हा रुग्ण स्थलांतर करण्याचा क्षण सर्वांनी मोबाईल मध्ये तरी टिपलाच या शिवाय कोळेकर यांच्या माणुसकी कार्यतत्परतेचे कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Previous post कंग्राळी खुर्दमध्ये भरदिवसा घरफोडी
Next post हिंडलगा कारागृहातील कैद्याविरुद्ध गुन्हा दाखल