विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठाचा 23 वा दीक्षांत समारंभ संपन्न
बेळगांव :
विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठाचा 23 वा दीक्षांत समारंभ मंगळवारी व्हीटीयूच्या डॉ. एपीजे अब्दुल कलाम हॉल येथे संपन्न झाला. मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. या समारंभात आदि चुन्चनगिरी महासंस्थान मठाचे जगद्गुरू , डॉ . श्री निर्मलानंद स्वामीजी, राष्ट्रीय शिक्षा समिती ट्रस्टचे मानद सचिव डॉ. ए, व्ही.एस. मूर्ती आणि म्हैसूर मेक्रान टाइल कंपनी लिमिटेडचे अध्यक्ष एच.एन. शेट्टी यांना मानद डॉक्टरेट पदवीने सन्मानित केले
बंगळुरूच्या सर.एम.विश्वेश्वराया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचा विद्यार्थी मदकशिर चिन्मय विकास याने 13 सुवर्णपदके जिंकली आहेत तर , , बंगळुरू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचा मेकॅनिकल इंजिनीअरिंगचा विद्यार्थी 7, , सर एम. विश्वेश्वरय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, बेंगळुरूचा इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनिअरिंगचा विद्यार्थी गुडिकल साई वंशी याने 7 सुवर्णपदक मिळविली आहेत .