हलगा जवळ भरधाव दुचाकीस्वार अपघातात ठार झाला
बेळगाव :
भरधाव दुचाकीस्वार अपघातात ठार झाला. ही घटना रविवारी रात्री सव्वाबाराच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावर हलगा उड्डाणपुलाजवळ घडली. फारुख अकानबाशा नदाफ (वय 38, रा. रामलिंगेश्वर गल्ली, होळेहोसूर, ता. बैलहोंगल) असे मृताचे नाव आहे.
सदर तरुण रविवारी रात्री दुचाकीवरुन बेळगावहून धारवाडकडे निघाला होता. भरधाव दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी घसरली आणि रस्त्याकडेला असलेल्या सिमेंट कठड्याला जोराची धडक बसून त्याच्या डोकीला गंभीर दुखापत होऊन तो जागीच ठार झाला. याप्रकरणी हिरेबागेवाडी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस उपनिरीक्षक अविनाश तपास करीत आहेत.