बेळगाव बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी सुधीर चव्हाण
बेळगाव:
जवळपास तीन हजार हून अधिक वकील सदस्य असलेल्या बेळगाव बार असोसिएशन या प्रतिष्ठित संघटनेच्या अध्यक्षपदी महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते वकील सुधीर चव्हाण यांची निवड झाली आहे
तत्कालीन बार असोसिशनचे अध्यक्ष प्रभू यत्नट्टी यांची सनद रद्द झाल्याने बेळगाव वकील संघटनेचे अध्यक्ष पद काही दिवसापासून रिक्त होते. संघटनेच्या घटनेनुसार कार्यकारणीने नवीन अध्यक्ष नियुक्त केला आहे.
सोमवारी सायंकाळी बेळगाव वकील संघटनेच्या झालेल्या बैठकीत कंग्राळी बी के गावचे सुपुत्र सुधीर चव्हाण यांची अध्यक्ष पदी निवड करण्यात आली. चव्हाण यांच्या निवडीने बेळगाव बार असोसिएशनला जवळपास 30हून अधिक वर्षांनी मराठी माणसाला अध्यक्ष पद मिळाले ही अभिमानाची गोष्ट आहे
1990-91 च्या काळात कै. किसनराव येळ्ळूरकर यांची जिल्ह्यातील चारशे वकिलांनी एकमताने निवडून देत बार असोसएशनच्या अध्यक्ष पदी नियुक्ती झाली होती त्यानंतर सुधीर चव्हाण हे बेळगाव जिल्ह्याच्या वकिलांचे नेतृत्व करणार आहेत वकिलांच्या समस्या सोडवण्यासाठी आपण अग्रेसर राहुन काम करू अशी प्रतिक्रिया सुधीर चव्हाण यांनी सांगितले.