मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यासह 19 नेत्यांना हायकमांडकडून बोलवणी
बंगळुरू :
काँग्रेस आमदारांमधील असंतोषाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस हायकमांडने हस्तक्षेप केला आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह राज्यातील अनेक नेत्यांना दिल्लीत उपस्थित राहण्याचे आदेश जारी केला आहे.
हायकमांडने काँग्रेसच्या १९ नेत्यांना दिल्लीत येण्याची सूचना केली असून या पार्श्वभूमीवर सतीश जारकीहोळी, रामलिंगरेड्डी यांच्यासह अनेक मंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा केली आहे.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, जी. परमेश्वर, एम. बी. पाटील, सतीश जारकीहोळी, रामलिंगरेड्डी, ईश्वरा खांद्रे, एच. के. पाटील, के. एच. मुनियप्पा, दिनेश गुंडुराव, कृष्णबायरे गौडा, जमीर अहमद, शिवानंद पाटील, एस. के. एस., मधु बंगारप्पा या 19 जणांना बुलाओ आदेश देण्यात आला आहे.