हिंडलगा कारागृहात मारामारी; खुनाचा प्रयत्न
बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील हिंडलगा कारागृहात दोन कैद्यांमध्ये हाणामारी झाल्याची घटना घडली आहे.
दंगली दरम्यान एका कैद्याने दुसऱ्या कैद्याला स्क्रू ड्रायव्हरनी 5 वेळा भोसकून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.ही घटना काल सायंकाळी हिंडलगा कारागृहात घडली.
कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या शंकर भजंत्री नावाच्या कैद्याने मंड्या येथील साईकुमार या अंडर ट्रायल कैद्यावर हल्ला केला आणि त्याच्यावर चाकूने वार करण्याचा प्रयत्न केला. यात साईकुमार गंभीर जखमी झाला असून त्याला जिल्हा रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे.