12 वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार

12 वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार

सतना :

मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यात निर्भयासारखीच एक घटना समोर आली आहे. 12 वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार  करण्यात आला असून आरोपींनी मुलीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये रॉड टाकला. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. मुलीला गंभीर अवस्थेत रेवा येथे रेफर करण्यात आले आहे.

माहितीनुसार, सतना येथील एव बारा वर्षीय मुलगी कालपासून बेपत्ता होती. ती रक्ताच्या थारोळ्यात मैहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गंभीर अवस्थेत सापडली. पोलिसांनी मुलीला मैहर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले, तेथून तिला गंभीर अवस्थेत रेवा येथे रेफर करण्यात आले आहे. तपासादरम्यान माहिती समोर आली की, ही मुलगी सकाळी सात वाजता परिसरातील मंदिराकडे जात होती. या दरम्यान, आरोपींनी तिला पकडले. कालव्याच्या काठावरील झुडपात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. तसेत तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये काहीतरी टाकण्यात आले आहे.

पीडितेच्या नातेवाईकांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून दोघांना अटक करण्यात आली आहे. या घटनेची माहिती मिळताच एसडीएम आणि एसडीओपी पोलिसांसह मैहर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पोहोचले. या प्रकरणी बलात्कारासह पॉस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी 2 संशयितांना अटकही केली आहे. अटक केलेल्या संशयितांची पोलीस चौकशी करत आहेत.

माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांची सरकारवर टिका : या घटनेवर शोक व्यक्त करत राज्याचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी शिवराज सरकारवर निशाणा साधल आहे. त्यांनी ट्विटरवर लिहिले की, “मैहरमध्ये एका लहान मुलीवर झालेल्या बलात्काराची घटना अत्यंत निंदनीय आहे. निर्भया घटनेप्रमाणेच मुलीसोबत अमानुष वागणूक झाल्याची बाबही समोर येत आहे. शिवराज सरकार बहिणी-मुलींना सुरक्षा देण्यात पूर्णपणे अपयशी ठरल्याचे राज्यातील मुलींवरील अत्याचाराच्या घटनांनी सिद्ध झाले आहे. मुलीवर उत्तम उपचार करून तिला तातडीने एक कोटी रुपयांची आर्थिक मदत द्यावी, अशी माझी मुख्यमंत्र्यांकडे मागणी आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Previous post भाजपाची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर; सी. टी. रवी यांना वगळले!
Next post बेळगावातून दोन संशयित दहशतवाद्यांना अटक