एंजल फाउंडेशन कडून शहरातील बेघर व गरजूंना ब्लँकेटचे वाटप
एंजल फाउंडेशन कडून शहरातील बेघर व गरजूंना ब्लँकेटचे वाटप
बेळगाव:
गरजूंना मदत करण्याचे काम एंजल फाऊंडेशनने हाती घेतले. एंजेल फाऊंडेशनने पावसाळ्यात बसस्थानक आणि रेल्वे स्थानकाजवळील गरजू लोकांना मदत करण्याचे काम हाती घेतले आहे.
एंजल फाउंडेशनने शहरातील बेघरांना ब्लँकेटचे वाटप केले. एंजल फाऊंडेशनच्या संस्थापक मीनाताई बेनके यांनी सर्दी झालेल्या लोकांची माहिती मिळताच मदतीचा वसा घेतला. त्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील बेघर व गरजूंना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले.