खळबळजनक विधान, महात्मा गांधींचे वडील मुस्लिम जमीनदार : संभाजी भिडे
अमरावती :
महात्मा गांधी यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी आहे, मात्र करमचंद गांधी हे मोहनदास यांचे वडील नसून मुस्लिम जमीनदार हे त्यांचे खरे वडील आहेत, असे खळबळजनक वक्ते श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे संस्थापक मनोहर उर्फ संभाजी भिडे यांनी अमरावती येथील कार्यक्रमात केले आहे. याआधीही अनेकदा वादग्रस्त भाषणाची चर्चा झाली आहे. गुरुवारी रात्री बडनेरा रस्त्यावरील जय भारत मंगलम येथे संभाजी भिडे यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते.
भिडे म्नाळे, मोहनदास हे करमचंद यांच्या चौथ्या पत्नीचे पुत्र होते. करमचंद ज्या मुस्लिम जमीनदाराकडे काम करत होता, त्याच जमीनदाराकडून मोठी रक्कम चोरून तो पळून गेला होता. त्यामुळे संतप्त झालेल्या मुस्लिम जमीनदाराने करमचंदच्या पत्नीला पळवून घरी आणले, तिला पत्नीसारखे वागवले. म्हणूनच करमचंद गांधी हे मोहनदासांचे खरे वडील नसून ते त्याच मुस्लिम जमीनदाराचे पुत्र आहेत. मोहनदास यांची काळजी घेतल्याचे आणि शिक्षणही याच मुस्लिम पालकाकडून झाल्याचे सबळ पुरावे असल्याचा दावा संभाजी भिडे यांनी केला.