कॉलेज शौचालयात व्हिडिओ शूटिंग प्रकरण; तीन विद्यार्थिनींना जामीन
उडुपी;
कॉलेजच्या टॉयलेटमध्ये व्हिडिओ शूटिंग केल्याप्रकरणी उडुपी कोर्टाने तीन विद्यार्थिनींना जामीन मंजूर केला आहे.
उडुपीतील एका खाजगी महाविद्यालयाच्या शौचालयात व्हिडिओ शूटिंग केल्याच्या प्रकरणाने राष्ट्रीय स्तरावर वाद निर्माण केला आहे, दरम्यान, उडुपी न्यायालयाने तीन विद्यार्थिनींना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
उडुपी जिल्हा न्यायालयाने आरोपी शबानाज, अल्विया आणि अलीमातुल शाफिया यांना आज जामीन मंजूर केला.उडुपी नेत्रज्योती प्रायव्हेट कॉलेजच्या टॉयलेटमध्ये व्हिडीओ चित्रीकरण केल्याचा आरोप या तिघांवर झळकला आहे. याप्रकरणी मालपे पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटकेचा धोका असलेल्या तीन विद्यार्थिनींनी जामिनासाठी अर्ज केला होता. या संदर्भात न्यायालयाने जामीन मंजूर केला.