फुटबॉलपटू प्रतीक बर्डे याचे निधन
बेळगाव:
बेळगावचा नामवंत फुटबॉलपटू प्रतीक बर्डे याचे काल हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले प्रतीक हा अवघ्या तीस वर्षांचा होता. त्याच्या जाण्याने हळहळ व्यक्त करण्यात येत असून तो सेंट पॉल चा विद्यार्थी देखील होता.
नामवंत फुटबॉलपटू प्रतीक बर्डे यांनी बेळगाव मध्ये पार पडलेल्या तसेच बाहेर देखील पार पडलेल्या अनेक स्पर्धेमध्ये फुटबॉल मध्ये घवघवीत यश संपादन केले होते.
त्याच्या जाण्याने पोकळी निर्माण झाली असून ती न भरून निघणारी आहे. प्रतीक बर्डे हा रामदेव गल्ली येथील रहिवासी असून त्याच्या पश्चात आई-वडील……. असा परिवार आहे.