तेजस सुरेश पाटील यांच्या यशाबद्दल अभिनंदन
बेळगाव:
श्री वसंतराव पोतदार पॉलिटेक्निक कॉलेज (चापगाव तालुका. खानापूर) चा विद्यार्थी तेजस सुरेश पाटील याने सिव्हिल अभियांत्रिकी शाखेची अंतिम परीक्षा उत्कृष्ट गुणवत्तेने प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केली आहे.
तेजस सुरेश पाटील याने राज्यातील तंत्रशिक्षण विभागाच्या तंत्र परीक्षा मंडळातर्फे घेण्यात आलेल्या सहाव्या सत्राच्या अंतिम परीक्षेत ९६.५% गुण मिळवून सिव्हिल अभियांत्रिकी शाखेत पहिला आला. तेजस हा संजय इलेक्ट्रिकल्स खानापूरचा प्रोप.श्री कृष्णाजी पाटील यांचे नातू आणि श्री. संजय क्रु. पाटील यांचे पुतणे आहे.बांधताना संपर्क साधक श्री सुरेश कृष्णाजी पाटील व सहशिक्षिका सौ. प्रतिभा सुरेश पाटील (चन्नमनगर, बेळगाव) या ज्येष्ठ सुपुत्र आहेत. त्याला महाविद्यालयाचे प्राचार्य एस. एस.मालाज, विभागप्रमुख प्रा. लक्ष्मी अंगडी, प्रा. प्रमोद तेरदाळकर, प्रा. प्रदीप कुलकर्णी, प्रा. स्वाती जोशी, प्रा. स्वरूपा, प्रा. सीमा व पालकांचे मार्गदर्शन लाभले आहे. या शानदार यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे.