बेळगाव जिल्ह्यातील शाळा, अंगणवाडी केंद्रांना उद्या सुट्टी
बेळगाव :
गेल्या आठवडाभरापासून बेळगाव जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे नदीकाठावरील अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. बेळगाव जिल्ह्यातील अनेक तालुक्यात पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे बेळगाव जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी केंद्रासह प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना गुरुवारी (ता. 27 जुलै) सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. याबाबतचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी बजावला आहे..
रविवारपासून सर्वत्र पावसाचा जोर वाढला असून अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या आठवडाभरापासून जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू होती. पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणात पाणी आले असून, अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. तसेच पावसामुळे अनेक मार्ग बंद झाले असून, रस्त्यांवरही पाण्याची तळी साचली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी विविध भागातील पावसाळी परिस्थितीचा आढावा घेतला नागरिकांनी नदीपात्रात उतरु नये. नदीपात्रात तत्सम साहित्य किंवा जनावरे असल्यास असल्यास तत्काळ सुरक्षित ठिकाणी हलवावे. सखल भागातील नागरिकांना सतर्क रहावे. तसेच आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.