राज्यसभेचे माजी खासदार विजय दर्डा यांना कोळसा घोटाळा प्रकरणी चार वर्षांची शिक्षा

राज्यसभेचे माजी खासदार विजय दर्डा यांना कोळसा घोटाळा प्रकरणी चार वर्षांची शिक्षा

नवी दिल्ली:

राज्यसभेचे माजी खासदार विजय दर्डा यांना कोळसा घोटाळा प्रकरणी 4 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. विजय दर्डा यांना तुरुंगवास, मुलदा देवेंद्र दर्डा यांना चार वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. जेएलडी यवतमाळ एनर्जी प्रा. लि. चे संचालक मनोजकुमार जयस्वाल यांना चार वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. याच प्रकरणात निवृत्त कोळसा सचिव एच. सी. गुप्ता, दोन ज्येष्ठ अधिकारी के एस क्रोफा आणि के सी समरीया यांना तीन वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

विजय दर्डा काँग्रेसकडून राज्यसभेवर खासदार होते. गेल्या पाच दशकांपासून दर्डा कुटुंब राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात सक्रिय आहे. त्यामुळे आजच्या निकालानं दर्डा कुटुंबियांसमोरची आव्हानं नक्कीच वाढली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Previous post गळतगा ग्रामपंचायत अध्यक्ष राजू पाटील
Next post बेळगाव जिल्ह्यातील शाळा, अंगणवाडी केंद्रांना उद्या सुट्टी