गळतगा ग्रामपंचायत अध्यक्ष राजू पाटील

गळतगा ग्रामपंचायत अध्यक्ष राजू पाटील

निपाणी :

गळतगा ग्रामपंचायत अध्यक्षपदी भाजपाच्या राजू उर्फ अलगोंडा पाटील तर उपाध्यक्षपदी काँग्रेसच्या लक्कवा हुणसे यांची निवड करण्यात आली. यावेळी भाजप आणि काँग्रेस एकत्र येऊन समविचारी मंच स्थापन करून अध्यक्ष उपाध्यक्ष निवडी करण्यात आल्या. तसेच अडीच वर्षाच्या काळात निम्मा काळ अध्यक्ष, उपाध्यक्षांची बदल करून ग्रामपंचायतीचा कारभार होणार असल्याचे सांगण्यात आले. निवडणूक अधिकारी म्हणून तालुका पंचायतीमधील अधिकारी चौगुले यांनी काम पाहिले. अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीनंतर त्यांच्या समर्थकांनी गुलाबाची उधळण करून फटाक्यांच्या आतषबाजीसह जल्लोष साजरा केला.

या ग्रामपंचायतमध्ये ११ प्रभाग असून २८ सदस्य संख्या आहे. यावेळी झालेल्या अटीतटीच्या निवडणुकीत भाजपचे राजू पाटील हे अध्यक्ष तर काँग्रेसच्या लक्कवा हुणसे यांची निवड करण्यात आली. यावेळी माजी जिल्हा पंचायत सदस्य राजेंद्र वडर-पोवार, भरत नसलापुरे, प्रवीण विजयनगरे, संध्याराणी हुणसे, संपदा वडर, बसवराज पाटील, राजू कमतनुरे, माजी ग्रामपंचायत सदस्य दगडू वडर, विजय तेलवेकर, श्रीकांत बन्ने लक्ष्मण कोटे, राजू पंडित, बाबासाहेब जाधव, संजय खोत यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Previous post लोकसभा निवडणुकीसठी बेळगाव मतदारसंघातून भाजपचे तिकीट कोणाला?
Next post राज्यसभेचे माजी खासदार विजय दर्डा यांना कोळसा घोटाळा प्रकरणी चार वर्षांची शिक्षा