अलर्ट!!!पुढील 24 तासांत कर्नाटकसह अनेक ठिकाणी पूरस्थिती; हवामान खात्याचा अंदाज
बेळगाव :
बुधवारी उत्तर कर्नाटकातील अनेक ठिकाणी मोठ्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. हवामान खात्याने पुढील 24 तासांत कोस्टल कर्नाटक, कोकण आणि गोवा, एन. आय कर्नाटक, लगतच्या तेलंगणा आणि महाराष्ट्रातील अनेक परिसरात हवामान उपविभागातील काही पाणलोट आणि परिसरांमध्ये मध्यम स्वरूपाच्या पुराचा धोका संभवतो.
बेळगाव जिल्ह्यात सध्या जोरदार पाऊस कोसळत आहे त्यामुळे खबरदारी म्हणून बुधवारी जिल्ह्यातील सहा तालुक्यात शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. आता पुढील 24 तासासाठी हवामान खात्याने मोठ्या पावसाची शक्यता वर्तवली आहे.
हवामान खात्याने महाराष्ट्र उडुपी, उत्तरा कन्नड सह महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, उत्तर आणि दक्षिण गोवा या जिल्ह्यांमध्ये अचानक पूर येण्याची शक्यता वर्तवली असल्याने खानापूरसह बेळगाव जिल्ह्यातील नागरिकांनीही याबाबत दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी केले आहे.
म्हणाले की, अचानक पुर येऊ शकतो असा अंदाज वर्तविला गेल्याने खबरदारी म्हणून जनतेने बेळगाव जिल्ह्यातील खानापुरसह इतर तालुक्यातील जनतेने पाण्याच्या ठिकाणी धबधबे भेट देऊ नये आणि ट्रेकिंग बाहेर पडू नये.
यावेळी पावसात डोंगर कोसळण्याची शक्यता असते. त्यामुळे टेकडीवर राहणाऱ्या पर्यटकांनी व ग्रामस्थांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी.
ते पुढे म्हणाले की, शेजारील राज्यातील सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये अचानक पूर येण्याची शक्यता असल्याने खानापूरसह सीमावर्ती तालुक्यांमध्ये अधिकाऱ्यांनी सतत दक्ष ठेवावी अश्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत.