आ.अभय पाटील यांनी केली तांबीट गल्ली मध्ये ड्रेनेज पाणी समस्याची पाहणी
बेळगाव.
आमदार अभय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बेळगाव दक्षिण मतदारसंघातील सर्व नगर सेवक समस्यांना उत्तर देण्यासाठी कार्यरत आहेत. लोकांचे या समस्येवर तोडगा काढण्यासाठी ते मुसळधार पावसात कामावर गेले.
पण आज स्वतः अभय पाटील यांनी वॉर्ड क्र.16 येथील तांबीट गल्ली मध्ये ड्रेनेज पाणी समस्या पाहणी करण्यासाठी , नगरसेवक राजू भातकांडे यांच्या सोबत आले.आ.अभय पाटील यांनी त्वरीत महानगरपालिकेचे ए. इ. इ मंजूश्री, इंजिनियर बसणगौडा पाटील, यांना तातडीने या समस्येवर उपाययोजना करण्याची सुचना करण्यात आले.
यावेळी नगरसेवक जयंत जाधव, तांबीट गल्लीतील नागरिक आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
पावसाचे थैमान सुरू झाल्यामुळे बेळगाव शहर आणि परिसरातील नागरिकांचे दैनंदिन जीवनमान थंडावले आहे. दिवसभर पावसाच्या धारा कोसळत होत्या .मध्यरात्रीपासून पावसाचा जोर अधिकच वाढल्याचे दिसून आले . त्यामुळे शहराच्या सखल भागात पुन्हा एकदा पाणीच पाणी झाले आहे. नागरिकांना दैनंदिन व्यवहार करताना पावसाचा सामना करावा लागत आहे गेल्या अनेक दिवसांपासून मुसळधार पावसामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.