खानापूर तालुक्यात बुधवारी शाळांना सुटी!
खानापूर:
खानापूर तालुक्यात मंगळवारी झालेल्या धुवाधार पावसाची दखल लक्षात घेता आता बुधवारी आणखी एक दिवस सुट्टीचा दिवस वाढला आहे. खानापूर तालुक्यात मंगळवारी झालेल्या जोराच्या पावसामुळे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्या आदेशानुसार खानापूर तहसीलदार प्रवीण गायकवाड यांनी बुधवारी सुट्टी असल्याचे जाहीर केले आहे.
खानापूर तालुका अतिवृष्टीचा तालुका ओळखला जातो यामुळे शनिवारपासून पावसाचे प्रमाण अधिक वाढल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी खानापूर तालुक्यातील दुर्गम भागात तसेच आडवाटेच्या रस्त्याने येणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांचा विचार लक्षात घेता मंगळवारी सुट्टी जाहीर केली. पण मंगळवारी दुपारनंतर पावसाचा जोर वाढल्याने पुन्हा आता आणखी एक दिवस सुट्टीचा दिवस वाढला आहे त्यामुळे बुधवार दी 26 रोजी ही खानापूर तालुक्यातील प्राथमिक माध्यमिक व पदवी पूर्व शाळांना सुट्टी जारी करण्यात आली आहे. असे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार खानापूर तहसीलदार प्रवीण गायकवाड यांनी जाहीर केले आहे