ट्रॅक्टर उलटून शेतकऱ्याचा मृत्यू
बेळगाव:
शेतात भात रोप लावण्यासाठी रोटरी मारतेवेळी ट्रॅक्टर उलटून घडलेल्या अपघातात एक शेतकरी जागीच ठार झाल्याची घटना आज मंगळवारी दुपारी खानापूर तालुक्यातील तिवोली येथे घडली.शेतात दुर्दैवी मृत्यू ओढवलेल्या शेतकऱ्याचे नांव पी. एस. लाटगावकर असे असून ते शिक्षक देखील होते. शेतात भात रोप लावण्यासाठी ट्रॅक्टरच्या सहाय्याने रोटरी मारताना एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच खानापूरचे आमदार विठ्ठलराव हलगेकर यांनी आपले सहकारी भरमानी पाटील यांच्यासह तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली होती. घटनास्थळी पोहोचताच आमदार हलगेकर यांनी पोलिसांना बोलावून घेतले. शेतात काम करताना दुर्दैवी मृत्यू ओढवलेल्या शिक्षक पी. एस. लाटगावकर यांच्याबद्दल तिवोली परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.