आ.अभय पाटील यांच्या कडून वेंकटेश ताशीलदार यांचे सत्कार आणि शुभेच्छा
बेळगाव :
मालदिव मधे झालेल्या १३व्या दक्षिण आशिया शरीरसैष्टव स्पर्धेत ३रा क्रमांक पटकविल्या बद्दल वेंकटेश किशोर ताशीलदार याला बेळगांव दक्षिण चे आमदार श्री अभय पाटील सर व इतर बेळगांव दक्षिण मधील नगरसेवक व कार्यकर्ते यांच्या तर्फे सत्कार करण्यात आले आणि त्यांचा भविष्यासाठी त्यांना शुभेच्छा दिले.
मालदिव येथे झालेल्या १३ व्या दक्षिण आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धेत बेळगावच्या व्यंकटेश ताशिलदार या व्यायामपटुने कांस्यपदक मिळवून भारताचा तिरंगा फडकविला.दि. ५ ते ९ जुलैपर्यंत झालेल्या या स्पर्धेत ६५ किलो वजन गटात व्यंकटेशने तिसरा क्रमांक मिळविला.
व्यंकटेश हा भवानीनगर येथील रहिवासी व महापालिका कर्मचारी किशोर ताशिलदार यांच्या मुलगा होय. व्यंकटेशचे महाविद्यालयीन शिक्षण आरपीडी कॉलेजमध्ये झाले. बेळगावला परतल्यानंतर व्यंकटेशची भवानीनगर परिसरात भव्य विजयी मिरवणूक काढण्यात आली. या यशाबद्दल व्यंकटेशवर सर्व थरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
या कार्यक्रमाला नगरसेवक सारंग राघोचे,नंदु मिरजकर,मंगेश पवार,नितिन जाधव,राजू भातखंडे,नगरसेविका सारिका पाटील,रवी सांब्रेकर, गिरीश धोंगडी, अभिजीत जवळकर आणि इतर नगरसेवक उपस्थित होते.
सत्कार करण्यात आले आणि त्यांचा भविष्यासाठी त्यांना शुभेच्छा दिले.